एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

हिशोब...

आमची प्रेरणा बालाजी शेठ ची अप्रतिम कविता हिशोब

हिशोब
-------------------------
सुंदर कवितेवर,
विडंबनाची टाच रुतवत
लिहिताना,
टोचत राहतं, की,
आपली लेखणी
वेदनेत रुजली नाहीच
कधी.

ओळितील
व्यंग शोधण्यातच
आयुष्य सरतं ,
अर्थाच दान
आपण झेललं
नाही कधी.

कोलाहल, एवढा,
सर्वत्र, की,
मिथुनमग्न जोडप्याला
एकाग्र होणं
जमलं नाही कधी.

हिशोब असा,
की -
विडंबन पडत राहिलं,
कायमच.

या "केश्या"ला
लाज वाटलीच नाही कधी.!

-----------------------------
-- केशवसुमार, पुणे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: