एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

ठसे...

बासूशेठ चे भोवरे वाचल्यावर आम्ही गपकन आमचा उजवा गाल आमच्या दोन्ही हातांनी झाकून घेतला... जुन्या आठवणींचे ठसे आम्हाला पुन्हा लख्ख दिसू लागले...

ठसे
---------
रात्र
उलटल्यावर अवतरतो.

सभोवार,
तारांगण डहूळ होत जाताना,
अंतःपुराचे दरवाजे
उघडले जातात,
श्वास रोखून अंधारभर.

मग,
टप्प्याटप्प्याने
'सगळे' कपडे अलगद बदलत,
भरभर आवरतो ,
आत घाबरलेला आज्ञाधारक पती.

सावध अंदाज घेत
अंथरुणात शिरतो,
कचकन पाय पडतो,
नेमका बायकोच्या हतावर.

- भयभीत गालावर
जहरी ठसे हुळहुळत राहतात,
रात्रभर !

--------------------------------------------
केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: