एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

गमक-२

आमची प्रेरणा मिल्याचे गमक (http://www.manogat.com/node/18522)

कसे लपावे घरात लफडे कळेल का हे मला गमक
अहो असा मी भितो कशाला? कलत्र अमुचे असे कडक

कधीतरी छंदमुक्त जगणे जमायला ही मला हवे
कुणा बरोबर तरी अगोदर, हवेच जुळवायला यमक

कुठेच नामोनिशाण मागे उरायला जर नको मला
हवेच सोडायला मला मग अधीर ओठांवरी उदक

उगाच बोभाट ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे जगाला कळेल सगळे निघून येईल ती तडक

लगेच बडवेल खेटराने तिला जरा लागता खबर
टिकायचे तर तिला न याची कधीच लागो जरा भणक

क्षणात पडतील दात माझे क्षणात होईल बोळके
अशीच घावामध्ये तिच्या हो खरेच आहे बरे धमक

विडंबनाचा गुलाम झाला... दिलेस सोडून काव्य तू
शहाणपण का सुचेल "केश्या" अता तुला लागली चटक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: