एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

काव्य अम्ही करणार अम्हाला काय कुनाची भीती ?...

Tambeशेठचे द्या टाळी वरचे स्टेटस https://www.facebook.com/groups/dyataali/permalink/339556476162851/
वाचून आमच्या काव्यकर्तनालयाच्या काही गिऱ्हाइकाची आठवण झाली त्यांच्या गौरवार्थ आम्ही लिहिलेल्या काही ओळी ...

काव्य अम्ही करणार अम्हाला काय कुनाची भीती ?
देत त्रास अन फिरण्यासाठी काव्य घेतलं हाती !

कवितांच्या समुहात उमगली छळवादाची रीत
र ला ट जुळवून लिहिण्याची जडली येडी प्रीत
फुसकी यमकं जुळवून लिहितो अशी आमची ख्याती !

कुंथावं ना सुचुन लिहावं हेच अम्हाला ठावं
टॅग करावं, करुन छळावं हेच अम्हाला ठावं
वा वा मिळण्यासाठी जोडू ओळख-मैत्री-नाती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: