एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

माय बहिण ही नाती हरली ...

माय बहिण ही नाती हरली
कुठे निवाडा मला ?
आज मी निराधार अबला

या 'संतां'ची रीत निराळी
प्रभूनामाच्या मुखात ओळी
सत्संगाची रंगत-संगत,
करूनि शोषले मला

न्याय आंधळा बाई, बाई !
'बालका'स त्या पदरी घेई
कसे विसरता कर्म मुलाचे,
झणी फसवली 'तुला'

जगी जयाला कोणी नाही
तूच तयाची होसी आई
या अबलांची कशी येईना,
करुणा देवा तुला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: