एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

आतून जागे...

आमची प्रेरणा Digheशेठची सुंदर कविता
https://www.facebook.com/ganesh.dighe.942/posts/409417185815440

आतून जागे गुत्ते सगळे
ड्राय डे म्हणती बाहेरचे
शुद्ध हरवली तू पण मी पण ....
दारावरती पावूल वाजे, हप्ते पोलिस ओळखतो.
क्वाटर मोजीत कोणी खुळचट
मग्न स्व्तातच बडबडतो
घरा पल्याडचा बार गबाळा
निमूट अव्याहत गजबजतो
आणि ईकडे घरात अपुल्या
जॉनी वॉकर अवतरतो
ग्लासा मध्ये बर्फ़ टाकून
तो करात माझ्या खळखळतो.
वीज चमकते, मेघ बरसतो
मीही आतून सळसळतो
बघता बघता ...क्षणात एका
क्षीण सगळा विरघळतो.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: