एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

काव्य...



आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम (http://www.manogat.com/node/16852)

वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे
त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे

मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे?
अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे!

'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी
जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे

तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती..
रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे!

मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण..
चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे!

जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या...
कोपऱ्या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: