एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

नेट...

गेल्या महिन्याभरात ऑब्लिवियन,पॅसिफिक रीम वगैरे वगैरे इंग्रजी चित्रपटातून २०५०-२०६० मध्ये जग कसे असेल ह्याचे अतिरंजित चित्रीकरण बघून आपण भारतीय किती मागासलेले आहोत ह्याचा जबरदस्त  न्यूनगंड तयार झाला होता,त्यातच  वेगवेगळ्या राजकीय पक्ष्यांच्या भविष्यातील भारत असा असेल तसा असेल अश्या वल्गना ही ऐकल्या होत्या त्यामुळे हल्ली मध्येच आमचा मुंगेरीलाल होतो आणि भारतात खेडोपाडी इंटरनेट पोचले आहे.‌..सगळ्यांकडे लॅपटॉप , स्मार्ट फोन आहेत ...सर्व गोष्टी ऍटोमॅटिक होता आहेत.. फक्त एक बटण दाबायचा अवकाश.. अशी सुरस आणि चमत्कारिक दिवा स्वप्न पाहण्याची सवय आम्हाला लागली आहे ... तशात  Balajiशेठची अप्रतिम कविता 'पाऊस'  (https://www.facebook.com/notes/balaji-sutar/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/665775513451558) काल वाचनात आली आणि आमचा डावा डोळा फडफडू लागला

नेट अगदी मोडकळीला आल्यासारखं-

"आज तरी मेल उघडते की नाही कुणास ठाऊक?
नोटिफिकेशन अगदी मिळेनासे झालेत, चार दिवसांपासून."
लॅपटॉपकडे पाहत
रामभाऊ तलाठ्याची बायको वैतागवैतागून म्हणते.

"मायला, शेअरट्रान्फर व्हऊ देत न्हाई ह्यो बाबा,
आजूक चाराठ दिवस.."
धोंडू दलाल खोलीतून दलालस्ट्रीट्वर नजर टाकत
बिडीचे लोट सोडतो.

"आर्यन् , व्हॅटस अप खेळू नकोस,
आत ये नि फोन बंद कर पाहू आधी.."
कुलकर्णी मास्तरांची बायको पोरावर मंजुळ ओरडते.

"कुटल्या जल्माचा सूड घेतोय, सुडक्या.."
गुरवाची म्हातारी तोंडातल्या तोंडात शिव्या घालते.
उघडलेल्या ब्राउझरसोबतच
बुकमार्क केलेली यादी न्याहाळून घेत,
विण्डोज एक्स्पोलर मध्ये माउस फिरवत डाऊनलोडचा धांडोळा घेते.

"प्रिंटरकडं बगा जरा, चार दिसापास्नं कुरकुरतंय,
डाक्टराला दावाया फायजी..किती सांगू ? कितींदा सांगू ?"
डोळे सुजलेली लव्हारीण नवऱ्यापुढे तीनतीनदा काकुळती येते.

"मरू दे तिकडं, जाव दे, मायला, किरकिर जाईल जल्माची.."
जवळ कवडीसुद्धा नसलेला लव्हार बायकोला म्हणतो,
"ह्यो दावेदार असा मान टाकून पडलाय, आठदी झालं..
भनभन क्येलीस तर बरगाड मोडून हातात दीन बग, आयघाल्ये.."

लव्हाराला फेसबुकची भयाण तलफ आलेली,
मोडेम निजल्या गाढवासारखं स्तब्ध निपचीत, अन् ,
नेट, गावठी गुत्त्यासारखा, अगदीच वायद्यावर बंद झालेलं !

----------------------------------------------------------------------
                                 - केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: