एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

फेबुलागीं जीवा लागलीसे वाट...

ह्या फेबुच्या व्यसना वर उपाय म्हणून अधूनमधून जालसंन्यास, गड्या आपली भिंत बरी वगैरे वगैरेचे झटके आम्हाला नेहमी येत असतात...आपणच व्यसनमुक्ती केंद्र काढावे, धंदा जोरात चालेल अश्या चमत्कारिक कल्पना हि डोक्यात येतात..अश्याच एका झटक्या मध्ये आम्ही डायरेक्ट 'त्याला'च चालेंज केले ....

फेबुलागीं जीवा लागलीसे वाट ।
पाहे रात्रीं दिवस भिंत मी ही ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन 'लाइक' पाहें ॥२॥

समुहांच्या मुळा लेखकु बोकाळली ।
पाडताहे बुंदी स्टेटसांची ॥३॥

वाढलिया वेड अति पोस्ट करी ।
वाट पाहे अणि कॉमेंटाची ॥४॥

'केश्या' म्हणे मज लागलेसे व्यसन ।
सोडवुनि मुखबुक दावीं देवा ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: