एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

(गंड)

आमची प्रेरणा खोडसाळ गुरुजींची अप्रतिम कविता गंड (http://www.manogat.com/node/17230)

मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे

'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!

वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे

चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे

मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
वृत्त अन बाराखडी हे बंड आहे

बोलले काका, मुळी हे काव्य नाही
जाउ दे तो गर्व, अन पाखंड आहे

कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे

'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!
संपले नाही तुझे पौगंड आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: