एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

निघाली डिलिटुनी ही स्वारी...

गेले काही दिवस जालावर काही कवी लोकांनी चला मी फेबुक सोडतो , चाललो घरी, चाललो पैलतीरी वगैरे वल्गना करणारी कवने प्रसवली ती वाचून समस्त जालकरांनी आनंदून लाईक, वावा कॉमेंट चे पाऊस पडले.. त्याच आनंदात काही लोकांनी आम्हाला एक काव्य प्रसवण्याची सुपारी दिली ... म्हटलं नेकी और पुछ पुछ... हे घ्या काव्य ;)

निघाली डिलिटुनी ही स्वारी

ऐकताच हे खुशीत येई करुनी खातरी घेई
पहा 'लाडका' कवी आपुला फेबुक सोडुनि जाई
हा सुटकेचा स्वर्ग मानती समस्त जालावरी

पडतो पाया तुमच्या आणिक एक मागणे मागू
तुम्ही अम्हाला छळले इतुके नका कुणाला ट्यागू
त्या काव्याच्या भडीमारातुनी सुटका झाली खरी

जावा भाऊ, विसर आजवर जे काही बोललो
नव्हती लज्जा म्हणून तुम्हाला रागावून वागलो
परतुनी येईल मेला पुन्हा एकच चिंता उरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: