एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

शौलजा आली...

नवीन वर्षाचे स्वागत तडकदार फडकदार अश्या मराठमोळ्या लावण्या ऐकून कराव असा बेत मनात होता म्हणून जालावरून "अप्सरा आली..." हि लावणी शोधून काढली....आणि आमच्या ज्ञानेश्वरांच्या रेड्याला लाजवेल अश्या आवाजात आम्ही रेकायला सुरुवात केली ... गेले काही दिवस चव्हाट्यावर सुरु असलेले धर्म आणि रामायण कांड, त्याला अनुसुरून आलेली असंख्य स्टेटसेस वाचून डोक्याची पार मंडई झालेली त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच आणि आम्ही भलेच काही तरी बडबडू लागलो

उत्तिष्ठत व्हा हो जाग्रत व्हा हो हळी अशी ही आली
रामात रमली धर्मात भिजली चव्हाटी या अवतरली
ती हसली रुसली परी न चिडली पुरून साऱ्यांना उरली
ती चिवट खमकी ...बोलून थकली चव्हाटकर ही सगळी

शौलजा आली वेद पुराणे प्याली
स्टेटसा व्याली चव्हाटा नगरी भ्याली
ती हसली जाली भलीभली भेदरली
शौलजा आली हजार कॉमेंट न्हाली

जरी आज परिस्थिती घोर निराशा फार सभोवार
सांगते तुम्ही तेजस्वी पुत्र अमृताचे नको हा विसर
थांबवा धर्मनिंदा, करा परमशक्तीचा, तुम्ही आदर

ही अशी धमकी भरलेली स्टेटस उपदेशाची
सत्वरी पसरली चव्हाटी ठिनगी ही वादाची

ती हसली रुसली परी न चिडली पुरून साऱ्यांना उरली
ती चिवट खमकी ...बोलून थकली चव्हाटकर ही सगळी

शौलजा आली वेद पुराणे प्याली
स्टेटसा व्याली चव्हाटा नगरी भ्याली
ती हसली जाली भलीभली भेदरली
शौलजा आली हजार कॉमेंट न्हाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: