एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

पोष्ट सांभाळ चव्हाटा ह्यो मेला...

पोष्ट सांभाळ चव्हाटा ह्यो मेला
तुझ्या स्टेटसवर चालल कल्ला

मूळ स्टेटस देणं न घेणं
त्यात नामांकित जमल्यात बेणं
नि कॉमेंट वाढल्या जोमानं
मुद्यागुद्यांनं उभारी धरली
शब्दांशब्दात विखार भरली
नाही लॉजिकला जागा उरली
रंग चर्चेला भलता आला

ह्यो धर्मांवर आला धागा
याची कुठवर ठेवशील निगा ?
उपदेशाचे स्टेटस म्हणजे आवतणं जगा
याला कॉमेंट पडतील किती ?
पोर चव्हाटी लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या तासात घातला घाला

तुम्हा 'रामायण'आठवत नाही
तिथे होती झाली हातघाई
टर उडवली तरी शहाणपण येत नाही
आता तरी लोकहो व्हा जागं !
नको बोलण्याचा धरू ह्या राग
बघा चिखलात दिसतात माग
'डुक्कर बोध' "केश्या"ने केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: