एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

पूर्वीगत पण आता काही करवत नाही...

आमची प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही (http://www.manogat.com/node/18659)

पूर्वीगत पण आता काही करवत नाही
पूर्वीगत अन आता काही झेपत नाही

भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो
गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही

बंद घेतली करून आधी खिडक्या दारे
जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही

खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो
खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही

खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी
चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही

हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा
तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही

जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती
उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही

पुढे व्हायचे काय परी सापडल्यावरती
किती बडवले कुणास आता सांगत नाही

कशास "केश्या" करतो असली विडंबने तू
कसे चांगले काही तुजला बघवत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: