एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

(गलका!)

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल गलका! (http://sureshbhat.in/node/1483)

(गलका!)

धक्का बसला तिला जरासा, मला लागला झटका!
सॉरी म्हणता... कानाखाली तिने लावला फटका!

सजावटींच्या दिव्यांत बसतो शांत चाखतो मदिरा...
जरी चघळतो 'मावा', 'पोलो' तिला जाणवे भपका!

उगीच का डोळ्यांत अचानक माझ्या आले पाणी?
नाव घेतले माझे तू अन, मला लागला ठसका!

असा आज का, लंगडतो मी काय तुम्हाला सांगू?
तिच्या घरातिल कुत्र्याचा मी पार घेतला धसका!

झोप हवीशी सुट्टीची... पण सासू ही तडमडते...
जागे होणे भाग अता मज, अन सुट्टीचा पचका!

मौन आमचे घरात असते, घरात असता पत्नी...
ती माहेरी गेल्यावरती घरी मित्रांचा गलका!

जागा झाला माझ्यामधला आज बेरकी "केश्या"...
काव्य मिळाले सुरेख इतके जणू लागला मटका!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: