एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

एका समुही होते जोशी इथे अनेक...

एका समुही होते जोशी इथे अनेक
आहे मिलिंद म्हणुनी जोशी तयात एक

येताच तयास कोणी लिहिण्या निबंध सांगे
सर्वांच स्टेटसावर घाली सदैव दंगे
दावूनि दात करतो 'हेहे' किती सुरेख
आहे मिलिंद म्हणुनी जोशी तयात एक

जोश्यास खाज भारी, वेडा हसे स्वतःशी
कोणी न त्यास वाची , सांगे असे जगाशी
जो तो तयास सांगी सोडून 'हेहे' टाक
आहे मिलिंद म्हणुनी जोशी तयात एक

एके दिनी परंतु जोश्यास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
जालात पाहताना शोधूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो व्हायरस एक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: