एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

कितीक समुद्रापलीकडचा ...

Smita Gaanu Joglekarकाकूंची https://www.facebook.com/photo.php?fbid=726446010705039&set=a.560794303936878.148530.100000189411178&type=1कविता वाचून काही वर्षापूर्वी एका जुन्या मित्राला आम्ही भेटले होते त्याची आठवण झाली

कितीक समुद्रापलीकडचा माझा मित्र
पुऱ्या सात वर्षांनी मायदेशी आला
तब्बल दहा दिवसांसाठी 

भेटलो नेहमीप्रमाणे
सहकारी मित्र दोस्त वगैरे

आता आम्हीच चाळीशीपार
आणि काही सहकारी तर साठीच्या पुढे
मित्र आणि बाकी सारे
मुबलक प्यायलो प्यायलो हसलो हिंदकळलो
पुऱ्या सात वर्षाची कसर भरत

निघताना तो गप्प गप्प , सुन्न
" ठरवलंय आता दरवर्षी यायचं "
दबल्या आवाजात तो पुटपुटल्यागत

आणि निरोपाच्या मिठीनंतर तर काहीच नाही उरली

गदगदणार्या त्याच्या देहातून
फक्त अगतिकता , स्वतःवर दोषारोपण
आणे सारी शुद्ध विसविशीत झाल्यानंतर येणारी
काळीज चिरून जाणारी
विकल निराश बोच फक्त

मला उगाचच फार शक्तिशाली वाटून गेलं
आणि मी अधिकच आश्वासक समंजसपणे
त्याला घट्ट खंद्याभोवती गुरफटून घेतलं

पुढची काही पावलं त्याला पुरेल इतकं .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: