एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

चला दोस्तहो 'साहित्या'वर बोलू काही !...

परवा पांडुरंगशेठनी 'सुज्ञ' अस म्हणत नियमाचा बडगा दाखवला.. तेव्हा आम्ही जरा श्रीफळाच्या कल्पनेने घाबरलोच... तरी हि सुज्ञपणे हिम्मत करून इथे विडंबन चालेल का नाही हे विचारून खुंटा बळकट करून घेतला .. 'विडंबन ही एक गंभीर 'साहित्य'कृती असते' असे प्रत्यक्ष पांडुरंगानेच सांगितल्यावर आम्हाला स्वर्ग दोनच बोटे उरला.. आता आम्ही "साहित्यिक केशवसुमार" अशी सही करायला मोकळे झालो ... तर आमची हि नवी गंभीर साहित्यकृती पांडुरंग चरणी अर्पण :)))
( पांडुरंगशेठ हलके घ्या)

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो 'साहित्या'वर बोलू काही !

उगाच चर्चा 'साहित्या'वर करत रहा तू
कळले नाही तरी ही त्यावर बोलू काही

तुफान पाहुन चर्चेवर कुजबुजले थोडे
भिंतीवरती अपुल्या नंतर बोलू काही

हवाहवासा टिआर्पी मज हवाच आहे
नकोनकोते 'साहित्या'वर बोलू काही

इनोद-चेष्टा नको टवाळी 'साहित्या'तुन
नियम दाखवू आधी नंतर बोलू काही

शब्द नसू दे हातामध्ये काठी म्हणुनी
हलके फुलके आयुष्यावर बोलू काही

(साहित्यिक)केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: