एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

काढलेल्या स्टेटसपायी सोडुनिया 'बाबा' गेला...

Tambeशेठ ची चाललेली पब्लिक मनधरणी बघून आम्हाला पी.सावळाराम यांचे " कल्पवृक्ष कन्येसाठी.." हे गाणे आठवले... बराच प्रयत्न केला पण मूळ गाण्याचे बोल काही आठवेनात... शेवटी आम्हाले जे आठवले ते आम्ही लिहिले...

काढलेल्या स्टेटसपायी सोडुनिया 'बाबा' गेला
खप सारा उतरुन गेला, या हो पुन्हा लिहायाला

तुम्ही गेला आणिक 'पोर्के'पण चव्हाट्या आले
भिंत तुमची बहरत असता थोरपण तुमचे कळले
फेसबुकी स्टेटस तुमचे तीर्थक्षेत्र काशी झाले !
तुम्हावीण शोभा नाही चव्हाट्याच्या वैभवाला

पोर सोर तुमचे स्टेटस भिंतीवरी ते बघतात
तरी पण ते येथे नाही खंत याची करतात
दोन ओळी अमृताच्या पंचप्राण तुमचे त्यात
चव्हाट्यावरी परतून या हो 'बाबा' एकच वेळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: