एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

विरूप...

आमची प्रेरणा Balaji Sutar यांची अप्रतिम कविता " विरूप "
https://www.facebook.com/notes/balaji-sutar/विरूप/269343946428052

बालाजीशेठला जे वास्तवाचे "विरूप" दिसल ते उघड्या डोळ्यांनी बघायची हिम्मत आमच्यात नाही म्हणून आम्ही डोळे बंद करून त्या विरुपाचे दर्शन घ्यायचे ठरवलं... डोळे बंद केले आणि आम्हाला भलतेच विरूप दिसू लागले...

जालवर
वावरत राहताना-

इथे तिथे
निघालेली संकेतस्थळं, ब्लॅग
समुह, कट्टे.

घोंगावणा-या ( माशांसारखी ! )
आयडींची गजबज.

कायद्याने सांगितलेल्या
प्रायव्हसीची
आय-माय उद्धरत,
स्वच्छपणे
वॉलवर झळकत असलेल्या,
(व्हायरसहून
अधिक खतरनाक)
धंदेवाईक ऍप्स.

प्रसिद्धीलोलुपाचे
दहशतग्रस्त लोचट टॅग्स.
नागड्याने
जागोजाग रस्ता अडवून
भिकाऱ्यासारखे.

पौगंडावस्थेतील सांडाला
उत्तेजित करत सर्वत्र पसरलेल्या,
भन्नाट, कामुक जहिराती.

बुड्ढों को जवानी,
अन
केसांची स्वप्ने विकणाऱ्या
श्रिमंत कंपन्या.

पर्ट्या,
सहली, फ़ोटोंचे
अभिमानी, बटबटीत
प्रदर्शन.

मतदार यादीत असावी
तेवढी जाड मित्रांची संख्या
प्रोफाइलच्या छातीवर मिरवून
लोकांच्या मनात असुया भरवत
फेसबुकावर स्थानापन्न-
( पुष्ट उरोजासारखे आकर्षक )
सलमान, ह्रितिक, शाहरुख.

मी, तू , हा, ही, हे,
निर्ढावलेले, निर्लज्ज, निर्विकार,
आभासी भींतीवर, मग्न.!!

सालं,
नेट बंद करायच म्हटलं,
की, जीव घाबरून जातो,
उद्या परत, हेच, असंच,
सगळं..पुन:पुन्हा...
...मी किंवा ते मरेपर्यंत..?
------------------------------------------------

-- केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: