एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

धुम्मस...

धुम्मस
आमची प्रेरणा Balajiशेठ ची सुंदर कविता https://www.facebook.com/notes/balaji-sutar/धुम्मस/667222646640178

या समुहात
तसं सगळं छान आहे.

सगळे व्यवहार -
सामाजिक, राजकीय,
सांस्कृतिक,जातीय,
(अन् 'साहित्यिक', हे फार महत्त्वाचं.)
- ठीकठाक !

भाषिक व्याकरणाबद्दल
सांगायचं तर -
बरीच सैल झालीय
वीण सगळी.
कधी उसवेल सांगताच येत नाही.
धागा अजून तुटला नाही, म्हणून बरं !

खरंतर,
या सैल झालेल्या विणीला
सुरुंग लावून बत्ती द्यायची
खूप गरज भासतेय, विद्वानांना.

पण, झालंय काय, की,
इथली माणसं, त्यांचे अनुगामी,
आणि इथले विद्वान
फक्त बौद्धिक अगम्यागमन करून
आपल्यापुरताच सोडवतायत,
हा, शुद्धलेखनाचा प्रश्न.

- आणि, असं,
दुखणं हेल्याला असताना
औषध पखालीला देऊन
त्यांना 'मोकळं' झाल्यासारखंही वाटतं,
लगेचच !

असं, हे, सर्वत्र,
या समुहात !

सगळी गंमतच,
च्यायला !
---------------------------------------------
- केशवसुमार, फ्रँकफुर्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: