एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

कविता सुचे कुणाला अनुवादतात कोणी...

Joshiशेठ ला गेले दोन दिवस कविता/पद्य/गद्य ह्यांनी जस झपाटले आहे तसच काही वर्षा पूर्वी ह्या प्रश्नांनी आम्हाला हि छळले होते, पण आम्ही डगमगलो नाही. आम्ही लगेच दाढी वाढवली झब्बा झोळी असे वेषांतर केले आणि काव्य /साहित्य संमेलनाच्या वा-या सुरु केल्या...तिथेच आम्हाला सात्क्षात्कार झाला आणि आम्हाला सिद्धहस्त कवी होण्याची गुरु मंत्र सापडला ;)

कविता सुचे कुणाला अनुवादतात कोणी
मज पद्य ना सुचावे हा कर्मभोग आहे !

सांगू तरी कुणाला कळ आतल्या कवीची ?
प्रतिसाद येत नाही मज श्राप हाच आहे !

कविता लिहू पहातो कळतोच अर्थ त्यांचा
दुर्बोध बोल माझे विपरीत होत आहे !

द्या दोष वाचकांना, त्यांना मुळी कळेना
मग गद्य खपवुनी ते मी सिद्धहस्त आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: