काल गौरीताईंनी चव्हाट्यावर सोडलेली जळू आम्हाला जी चिकटली ती चिकटली आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच...
एका नदीत होत्या जळवा किती अनेक
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
शोषून रक्त बसल्या जळवा फुगीर अंगे
कोल्हा तरी बिचारा त्यांच्या सवे तरंगे
काठा वरून त्याला, साळू बघे सुरेख
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
साळूस कीव आली , ती धावली बिचारी
काही मदत करू का, कोल्हास ती विचारी
काढेन या जळूंना काटे मला अनेक
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
कोल्हा नको परंतु, साळूस त्या म्हणाला
झाल्यात तृप्त जळवा देती न त्रास मजला
तू काढताच यांना डसती नव्या अनेक
त्याच्या परी बऱ्या ह्या जळवा जुन्या ऐक
दिसला लबाड कोल्हा साळूस त्या क्षणैक
दिसला लबाड कोल्हा साळूस त्या क्षणैक......
एका नदीत होत्या जळवा किती अनेक
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
शोषून रक्त बसल्या जळवा फुगीर अंगे
कोल्हा तरी बिचारा त्यांच्या सवे तरंगे
काठा वरून त्याला, साळू बघे सुरेख
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
साळूस कीव आली , ती धावली बिचारी
काही मदत करू का, कोल्हास ती विचारी
काढेन या जळूंना काटे मला अनेक
होता वहात कोल्हा पाण्यात त्याच एक
कोल्हा नको परंतु, साळूस त्या म्हणाला
झाल्यात तृप्त जळवा देती न त्रास मजला
तू काढताच यांना डसती नव्या अनेक
त्याच्या परी बऱ्या ह्या जळवा जुन्या ऐक
दिसला लबाड कोल्हा साळूस त्या क्षणैक
दिसला लबाड कोल्हा साळूस त्या क्षणैक......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा