एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

श्रावण मासी हर्ष मानसी पूजाअर्चा चोहिकडे...

Mandar Kale ना पडलेला प्रश्न आम्हाला काही स्वस्थ बसून देईना... आम्ही लगेच आमच्या दिव्य शक्तीच्या जोरावर कोंबडी आणि बोकडाशी टेलीपथी द्वारे संपर्क साधला आणि श्रावण मासी हि कविता ते कशी म्हणतात हे जाणून घेतले ...

तर ऐका.....

श्रावण मासी हर्ष मानसी पूजाअर्चा चोहिकडे
घरात ज्या त्या शिजे सात्विक मांसभक्षणा खंड पडे

फडफड करूनी पंख आपले कुकुट सुखाने बागडती
हिरव्या कुरणी बकरा बकरी निजबाळांसह हुंदडती

निवांत शेळ्या चरती रानी कुकुट ही गाणी गात फिरे
त्याचा संगे गातो बोकड श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शना करु दे मानव हर्ष मावे ना हृदयात
बारा महिने अशीच राहु दे श्रावण महिन्याची रीत

(त.टी. टेलीपथी म्हणजे काय? ती कशी करतात? देव खरच आहे का? तुमची दिव्य शक्ती बघायला मिळेल का? श्रावण महिन्याची रीत काय? कोंबडी आणि बोकड यांना बोलता येते काय? त्यांची भाषा कुठली? इ.इ. असले भंपक प्रश्न इथे विचारू नयेत.. दुर्लक्ष केले जाईल .. त्यासाठी स्वतंत्र पोस्ट टाकावी ..चव्हाट्या वरीला तज्न्य लोक आपल्याला योग्य ते माग्ल दर्शन देतीलच )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: