एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

श्रावण मासी मद्द मानसी पण ना मिळते कोणीकडे...


Shripad Muley नी 'श्रावण मासी हर्ष मानसी .......हि कविता आजचा कवी कशी करेल ?' असा नको तो प्रश्न चव्हाट्यावर विचारला आणि आमचे तिरके डोके जोरात चालू लागले आणि आम्ही बरळू लागलो

श्रावण मासी मद्द मानसी पण ना मिळते कोणीकडे
हतास सुटते थरथर थोडी घशात कोरड खूप पडे

समोर बघता मदिरेचा हा पेग दुहेरी भरलासे
मादक वसने लेऊन ललना शयनमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो पेग अहा भरताच गडे
हिम खड्यांच्या, उंच थरांवर पिवळे पिवळे उन पडे

पेल्यावरती पेल भिडती अनंत संध्या राग अहा
पूर्ण नभावर होय रेखिले मदिरेचे ते रूप पहा

मद्य प्राशना निघतो 'केश्या' हर्ष माईना हृदयात
कधी न त्याच्या कडून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: