एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

चर्चा चर्चा अखंड दळूया...

आमची प्रेरणा चव्हाट्या वरील चर्चा आणि पी.सावळाराम यांचे सुंदरा गीत
धागा धागा अखंड विणूया
(http://www.aathavanitli-gani.com/Song/Dhaga_Dhaga_Akhand)

चर्चा चर्चा अखंड दळूया
मुद्दा मुद्दा मुखे म्हणूया

प्रतिक्रियेचे प्रतिसादांचे
उभे आडवे घालुन दंगे
विविध रंगी हे कंपूंचे
शस्त्र अपुले घेऊ संगे
विषयांतर हा नियमच पहिला
चर्च्यारंभी नित्य स्मरुया

चराचरांच्या चर्चांवरती
अवांतराच्या पिंका टाका
येता चर्चा अंगावरती
वर्ती-उडवा सहज काखा
विद्वत्तेचा लेवित बुरखा
लाडुमुगाचे फक्त वळूया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: