एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

सब लेखक तीन टक्के!...

विंदांची माफी मागून...

जितके मेंबर तितकी मते
जितके स्टेटस तितकी भूते
कोणी निर्लज्ज कोणी लोचट
कोणी पाशवी कोणी मवाळ
कोणी भोचक कोणी टवाळ
कधी लाथा कधी बुक्के
सब लेखक तीन टक्के!

त्याच चर्चा तेच वाद
त्याच टाळ्या तेच संवाद
तुम्ही टाका आम्ही लाईक
तीच सभा तेच माईक
जुन्या स्टेटस नवा चंग
जुनी धेडं नवा भंग
एडमिन तरी काय करणार?
तुम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच कंपू मधे
पुन्हा पुन्हा तोच डाव
नवे कच्चे जुने पक्के
सब लेखक तीन टक्के!

जिकडे चेष्टा तिकडे टोळी
जिकडे साहित्य तिकडे भोळी
(जिकडे फटके तिकडे गोळी)
ज्याचा स्टेटस त्याला लत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता
पुन्हा पुन्हा जुनाच वार
जुने कंपू नवा वॉर
याची माहिती त्याचे धक्के
सब लेखक तीन टक्के!

सब लेखक! वाचक कमी
कोण देईल त्यांची हमी?
स्टेटसवर कॉमेन्ट तरी
कोण देईल माझा बरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच टाकीन माझी मला!
टिकेपेक्षा लाईक बरा
चव्हाटावर कोण खरा?
कोणी छुपे कोणी मुके
सब लेखक तीन टक्के!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: