आमची प्रेरणा.. गदिमांचे अप्रतिम गाणे 'एका तळ्यात होती... ' (http://www.aathavanitli-gani.com/Song/Eka_Talyat_Hoti_Badake), आमचेच एक जुने विडंबन आणि पोप्याची पोस्ट ...
एका चव्हाटि जमली ही माणसे सुरेख
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
कोणी तरी म्हणाले अपुल्या मतास सांगा
त्यांनी सुरुच केला मग 'राज'कीय दंगा
गेले दुखावले त्या गरळी मुळे अनेक
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
वेड्यास खाज भारी, बरळे इथे स्वतःशी
कोणी न त्या विचारी, भांडे तरी जगाशी
जेष्ठांस बोल टोची, उरला न त्यास धाक
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
एके दिनी परंतु एडमिनला कळाले
नतद्रष्ट मुर्ख वेडे 'श्रिफळा'सवे उडाले
धुरळा जरा उडाला या चव्हाटि क्षणैक
मागे अता ही उरली माणसे सुरेख
एका चव्हाटि जमली ही माणसे सुरेख
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
कोणी तरी म्हणाले अपुल्या मतास सांगा
त्यांनी सुरुच केला मग 'राज'कीय दंगा
गेले दुखावले त्या गरळी मुळे अनेक
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
वेड्यास खाज भारी, बरळे इथे स्वतःशी
कोणी न त्या विचारी, भांडे तरी जगाशी
जेष्ठांस बोल टोची, उरला न त्यास धाक
घुसले हळुच होते नतद्रष्ट त्यात लोक
एके दिनी परंतु एडमिनला कळाले
नतद्रष्ट मुर्ख वेडे 'श्रिफळा'सवे उडाले
धुरळा जरा उडाला या चव्हाटि क्षणैक
मागे अता ही उरली माणसे सुरेख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा