चव्हाट्याशी जडले नाते बोरूघाशांचे
नि वादळ उठले स्टेट्सचे
विचारवंतां धनू उचल तू हे साहित्याचे
पूर्ण जाहले अन तांबेच्या हेतु अंतरीचे
उभे ठाकले अभास पांडू बापट तोडीचे
वक्र टाळकी काही जमली ही बुरखाधारी
बुरख्यामाजी लपवुनिया निजओळख सारी
निघु लागले टुम हळुं हळू जाली चर्चेचे
सरसावुनिया जो तो भाया सदा इथे राही
तडिताघातापरी भयंकर वाद रोज होई
उडू लागले रोजच खटके हे प्रतिसादांचे
जीए,मांजर,झुरळ, नायिका, बोर्ड दुकानांचे
दत्तक सासू , ईश्वर नश्वर,धागे व्याख्यांचे
तोडू लागले सगळे तारे येथे अकलेचे
स्त्री पुरुष हा वाद पाशवी पाहा सुरू झाला
नैतिकता, जात धर्म अन संस्कार ही आला
सुटू लागले सगळे संयम आणि सभ्यतेचे
भरू लागल्या शाळा ह्या स्टेटसच्या वरती
कंपूबाज ही जमू लागले त्या शाळा भवती
म्युन्सिपालटी होणे झाले रोजच स्टेट्सचे
हात जोडुनी विनवी' केश्या' आज ऍडमीनासी
नियमांचे हो घाला कुंपण तुम्ही चव्हाट्यासी
हे खेदाने लिहिले आहे दुःख वाचकांचे
नि वादळ उठले स्टेट्सचे
विचारवंतां धनू उचल तू हे साहित्याचे
पूर्ण जाहले अन तांबेच्या हेतु अंतरीचे
उभे ठाकले अभास पांडू बापट तोडीचे
वक्र टाळकी काही जमली ही बुरखाधारी
बुरख्यामाजी लपवुनिया निजओळख सारी
निघु लागले टुम हळुं हळू जाली चर्चेचे
सरसावुनिया जो तो भाया सदा इथे राही
तडिताघातापरी भयंकर वाद रोज होई
उडू लागले रोजच खटके हे प्रतिसादांचे
जीए,मांजर,झुरळ, नायिका, बोर्ड दुकानांचे
दत्तक सासू , ईश्वर नश्वर,धागे व्याख्यांचे
तोडू लागले सगळे तारे येथे अकलेचे
स्त्री पुरुष हा वाद पाशवी पाहा सुरू झाला
नैतिकता, जात धर्म अन संस्कार ही आला
सुटू लागले सगळे संयम आणि सभ्यतेचे
भरू लागल्या शाळा ह्या स्टेटसच्या वरती
कंपूबाज ही जमू लागले त्या शाळा भवती
म्युन्सिपालटी होणे झाले रोजच स्टेट्सचे
हात जोडुनी विनवी' केश्या' आज ऍडमीनासी
नियमांचे हो घाला कुंपण तुम्ही चव्हाट्यासी
हे खेदाने लिहिले आहे दुःख वाचकांचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा