एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

तुझी माझी धाव आहे भिंतीपासून भिंतीकडे !...


पुन्हा पुन्हा तेच घडे
कोण घेणार यातून धडे
तुझी माझी धाव आहे भिंतीपासून भिंतीकडे !
ठरवून सुद्धा कोणी नडे
ठरवून सुद्धा कोणी चिडे
तुझी माझी धाव आहे भिंतीपासून भिंतीकडे !

कोण तांदूळ कोण खडे
शब्दांमागे अर्थ दडे
तुझी माझी धाव आहे भिंतीपासून भिंतीकडे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: