Tambeशेठ तुमच्या मनात योग्य विचार आला होता ...आमच्या तिरक्या डोक्याची वायू वेगाने घोडदौड सुरु झालीच होती.. Joshiशेठच्या ह्या स्वर्गलोकीच्या अप्सरे वरून आम्हाला इहलोकीच्या काही पाशवी अप्सरा आठवल्या
इहलोकीची पहा अप्सरा आज चव्हाटी अवतरली
भेदक डोळे, काजळ कांती, जिव्हा विषरी लवलवली
कुंतल सगळे, राठ, मोकळे वाऱ्यावरती भिरभिरती
हसुनी बोलता भास होतसे चर्च बेल की खणखणती...
वक्र नासिके,वरी चामखीळ जशी मक्षिका भुणभुणती
समोर येता अशी भासते आग जणू ही धगधगती...
गोड हासरा मुखचंद्र हा पाहूनी हृदये थरथरती
वळे बोबडी कित्येकांची आणिक नजरा भिरभिरती...
घामरूपी या पाण्याने ही नार सदाची डबडबली
अंगकांतीचा सुगंध येता सारी धरती भणभणली...
गजगामीनी चाल पाहुनी अवनी सगळी डळमळली
ललकारीने या नारिच्या चवदा भुवने दुमदुमली....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा