आता पुन्हा स्टेटस येणार
मग काही जण काळीनिळी होणार
मग वादाला कंठ फुटणार
मग काहीजण मध्यस्ती करणार
मग कोणाला तरी काढण्यात येणार...
काय रे देवा...
मग ते काढलेले कुणाला सांगता नाही येणार...
मग ते ते लपवणार...
मग लपवूनही ते कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील चिडणार...
मित्र नसतील तर तर लाइक करणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि त्या सगळ्यानि त्यांचा नवा
समूह सुरू केला असणार...काय रे देवा...
मग नव्या समूहात एक स्टेटस टाकले असणार...
मग ते जुन्या समूहात पण टाकलेले असणार...
मग त्या दोघाची नोटिफिकेशन आलेली असणार...
मग काही जण ह्या समुहात असणार...
पण काही जण त्याही समुहात असणार...
मग मी नेमकं आता कुठे कॉमेंट
टाकावीत असा मला प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार...
काय रे देवा...
मग स्टेटसची आग थंडगार होऊन जाणार...
मग त्याला लाईकची सांत्वन लगडणार...
मग मी कॉमेंट इथे टाकलेल्या
कॉपी पेस्ट करून तिथे ही टाकणार
मग २४x७ वेळ अपुरा अपुरा वाटणार
मग उरी फुटून जावंसं वाटणार
समुहातून नाव काढून
त्या आपल्या भिंतीवरच लिहावंसं वाटणार...
मग सारंच कसं मूर्खासारखं
उत्कटं उत्कटं होत जाणार
पण तरीही फेसबुकच व्यसन
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण पूर्ण नाही सुटणार !...
काय रे देवा...
स्टेटस पडणार
मग कोणी लाइक करणार...
मग कॉमेंटकॉमेंट मधून चर्चा रंगणार...
मग त्यांच्या मनाला खटकणार
नियम न मोडून कोणीतरी काही लिहिणार...
पण त्यांना ते नाही पटणार...
मग त्याला हे खरमरीत उत्तर देणार...
मग ते चिघळणार...
मग पुन्हा चर्चेचे रूपांतर वादात होणार...
भांडण होऊ नये म्हणून कुणीतरी सबुरीने घ्यायला सांगणार
समेट होण्यासाठी समूहामध्ये मधला एक मार्ग शोधणार
एक नवीन स्टेटस तोपर्यंत टाकलेलं असणार
वादाचा नवा मुद्दा निघालेला असणार...
मग त्यांच्या जागी ते असणार...ह्यांच्या जागी हे असणार...
कपातलं वादळ स्टेटस कॉमेंटच्या रुपाने
समूहात सोसाट्याने पसरलेलं असणार.....
स्टेटस कालही आलेलं...
स्टेटस अत्ताही आलयं...
स्टेटस उद्याही येणार...
काय रे देवा...
मग काही जण काळीनिळी होणार
मग वादाला कंठ फुटणार
मग काहीजण मध्यस्ती करणार
मग कोणाला तरी काढण्यात येणार...
काय रे देवा...
मग ते काढलेले कुणाला सांगता नाही येणार...
मग ते ते लपवणार...
मग लपवूनही ते कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील चिडणार...
मित्र नसतील तर तर लाइक करणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि त्या सगळ्यानि त्यांचा नवा
समूह सुरू केला असणार...काय रे देवा...
मग नव्या समूहात एक स्टेटस टाकले असणार...
मग ते जुन्या समूहात पण टाकलेले असणार...
मग त्या दोघाची नोटिफिकेशन आलेली असणार...
मग काही जण ह्या समुहात असणार...
पण काही जण त्याही समुहात असणार...
मग मी नेमकं आता कुठे कॉमेंट
टाकावीत असा मला प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार...
काय रे देवा...
मग स्टेटसची आग थंडगार होऊन जाणार...
मग त्याला लाईकची सांत्वन लगडणार...
मग मी कॉमेंट इथे टाकलेल्या
कॉपी पेस्ट करून तिथे ही टाकणार
मग २४x७ वेळ अपुरा अपुरा वाटणार
मग उरी फुटून जावंसं वाटणार
समुहातून नाव काढून
त्या आपल्या भिंतीवरच लिहावंसं वाटणार...
मग सारंच कसं मूर्खासारखं
उत्कटं उत्कटं होत जाणार
पण तरीही फेसबुकच व्यसन
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण पूर्ण नाही सुटणार !...
काय रे देवा...
स्टेटस पडणार
मग कोणी लाइक करणार...
मग कॉमेंटकॉमेंट मधून चर्चा रंगणार...
मग त्यांच्या मनाला खटकणार
नियम न मोडून कोणीतरी काही लिहिणार...
पण त्यांना ते नाही पटणार...
मग त्याला हे खरमरीत उत्तर देणार...
मग ते चिघळणार...
मग पुन्हा चर्चेचे रूपांतर वादात होणार...
भांडण होऊ नये म्हणून कुणीतरी सबुरीने घ्यायला सांगणार
समेट होण्यासाठी समूहामध्ये मधला एक मार्ग शोधणार
एक नवीन स्टेटस तोपर्यंत टाकलेलं असणार
वादाचा नवा मुद्दा निघालेला असणार...
मग त्यांच्या जागी ते असणार...ह्यांच्या जागी हे असणार...
कपातलं वादळ स्टेटस कॉमेंटच्या रुपाने
समूहात सोसाट्याने पसरलेलं असणार.....
स्टेटस कालही आलेलं...
स्टेटस अत्ताही आलयं...
स्टेटस उद्याही येणार...
काय रे देवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा