एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

डिसेक्शन झाले रामाचे...

मागे काही घडलेल्या घटनांमुळे व्यथित होऊन सर्व समूहातील सक्रीय सहभागातून रजा घेतली होती... निव्वळ वाचनाचा आनंद अनुभवला... १०-१२ दिवस मित्र-परिवारा सह केलेल्या सहलीमुळे मनाची व्यथित अवस्था थोडी निवळली... सहलीवरून परत आल्यावर काल इथली महाविक्रमी पोस्टPriyaली कृपेने वाचनात आली ... आणि न राहून पुन्हा एक विडंबन पाडलेच...

प्रतिसादातून उठले वादळ हमरीतुमरीचे
डिसेक्शन झाले रामाचे

श्रीरामांना थर्डक्लास हे बोल मिथिलीचें
हटवादी अन अतिशहाण्या साऱ्या बायांचे
थोपवण्याचे आव्हान त्यांना असे शैलजेचे

भक्त शैलजा सांगे महती राम धनुर्धारी
शब्दामाजी एकवटुनिया निजभक्‍ति सारी
जमू लागले लोक हळू हळू पूर्ण तयारीचे

विस्फारुनिया जरा पापण्या जनता हे पाही
बघताबघता प्रतिसादातून वाद सुरू होई
रामायण ते वाचा आधी मुनी वाल्मीकींचे

प्रश्न उत्तरे वाचून सगळी , अचंबित सारे
मुक्त हतानी लिहिते झाले मुरलेले सारे
दुखू लागले पोट हळू हळू सर्व वाचकांचे

हात जोडुनी म्हणती वाचक पुरे करा आता
चावून चोथा झाला पुरता तरी ही का दळता
चौदाशेच्या वरती गेले टीआर्पि धाग्याचे

चिवटपणाने एकाकी पण लढली ती बाला
श्लोक,कविता, कथा पुराणे भडीमार केला
कौतुक वाटे फार "केशवा" तिच्या धारणांचे

जत्रेमध्ये जशी भरावी वगनाट्यं बारी
तशी रंगली चव्हाट्यावरी रामलीला न्यारी
आजवरीचे विक्रम तुटले साऱ्या चर्चांचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: