एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

आम्ही भरतो अमुचे माप...

आम्ही भरतो अमुचे माप,
उगा नको मग पश्चात्ताप !
काजवें न आणूं नयनीं,
पिउ जरी तो एक क्षणी !

अमुचा पेला देशीचा
नाक दाबुनी प्यायाचा
पिता बुडाशी गाळ दिसे .
त्या नवसागर नाव असे
घेउनि जा तो स्वतःघरी,
धुण्यास भांडी पीतळी बरी !

जें शिकलों गुत्यामाजी,
अध्याहृत ही टीप तया :-
“द्वितीय धारी ही न मजा,
प्रथम धार घ्या सोडुनियां !”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: