आमची प्रेरणा पुन्हा एकदा गदिमांचे अप्रतिम गाणे 'एका तळ्यात होती...' आमचेच कालचे विडंबन त्या वरचे प्रतिसाद आणि चव्हाट्या वरच्या इतर चर्चा....
एका डब्यात होते लाडू किती सुरेख
होता कुरूप काळा लाडू तयात एक
कोणी न तयास घेई चिवड्या भडंग संगे
सर्वांत तो तळाशी डब्यामधेच रांगे
पाहून रंग त्याचा , घेती कुणी न लोक
होता कुरूप काळा लाडू तयात एक
त्या लाडवा कळेना, बोले मनी स्वतःशी
कोणीच ना विचारी, सांगू तरी कुणाशी
जो तो मलाच टाळी माझा कशास धाक
होता कुरूप काळा लाडू तयात एक
एके दिनी परंतु त्या लाडवा कळाले
गुण औषधी स्वतःचे चर्चेत त्या समजले
जी ऐकली चव्हाटी चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो मुगलाडू एक
एका डब्यात होते लाडू किती सुरेख
होता कुरूप काळा लाडू तयात एक
कोणी न तयास घेई चिवड्या भडंग संगे
सर्वांत तो तळाशी डब्यामधेच रांगे
पाहून रंग त्याचा , घेती कुणी न लोक
होता कुरूप काळा लाडू तयात एक
त्या लाडवा कळेना, बोले मनी स्वतःशी
कोणीच ना विचारी, सांगू तरी कुणाशी
जो तो मलाच टाळी माझा कशास धाक
होता कुरूप काळा लाडू तयात एक
एके दिनी परंतु त्या लाडवा कळाले
गुण औषधी स्वतःचे चर्चेत त्या समजले
जी ऐकली चव्हाटी चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो मुगलाडू एक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा