एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

चला दोस्तहो या देवावर बोलू काही !...


"
बऱ्याच प्रोफाईल्स वर atheist असे लिहिलेले दिसते.
निरीश्वरवादाची व्याख्या काय?
प्रत्यक्षात असे जगता येते का?" या Nilesh Bandaleयांच्या स्टेटसवर झालेली चर्चा
आणि 
संदिप खरे यांची कविता आयुष्यावर बोलू काही
(
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ayushyavar_Bolu_Kahi)

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो या देवावर बोलू काही !

उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू
भिरकटली ना चर्चा तोवर बोलू काही

हवाहवासा TRP मज हवाच आहे
नकोनकोसे भलते सलते बोलू काही

अस्तिक-नास्तिक बघ दोघांची किती जुंपली
शतक तिहेरी झाल्या नंतर बोलू काही

तुफान पाहुन स्टेटसवर कुजबुजले थोडे
बाबा येतील मग त्यांच्याशी बोलू काही 

अभास, अदिती, गज्जू , शेट्ये अन बंडाळे
ईश्वर, नश्वर सोडून 'केश्या' बोलू काही

म्यूनसिपालटी ह्या स्टेटसची झाली पुरती
चला झोपूया उघ्या सकाळी बोलू काही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: